Tiger-3 सिनेमाचे पोस्टर लॉन्च

सलमान खान आणि कतरिना कैफ वॉर मूडमध्ये
Edited by: ब्युरो
Published on: September 04, 2023 13:24 PM
views 388  views

बॉलिवूड मधील सुपरस्टार सलमान खानचा आगामी सिनेमा टाइगर-3 कधी प्रदर्शित होणार याबद्दल चर्चा रंगत होती. अशातच आता सलमान खानने हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची तारीख जाहीर केली आहे. सलमान खान आणि कतरिनाचा अपकमिंग सिनेमा टाइगर-3 यंदाच्या दिवाळी दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

टाइगर-3 च्या पहिल्या पोस्टरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ वॉर मूडमध्ये दिसून येत आहेत. बॅकग्राउंडला एका बाजूला हेलिकॉप्टर आणि तर फ्रंटला सलमान खानने बुलेट प्रुफ जॅकेटसह स्कार्फ घातला आहे. त्याचसोबत कतरिनाचा सुद्धा डॅशिंग लूक पोस्टरमध्ये पहायला मिळत आहे.

अपकमिंग सिनेमा टाइगर-3 च्या पहिल्या पोस्टरमध्ये सस्पेंस उघड करत असे लिहिले आहे की, पठाण आणि वॉरच्या इंवेंट्सह पुढील कथा सलमान खान घेऊन येणार आहे. सिनेमाच्या पोस्टरसह सलमानने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, येतोय मी! दिवाळी 2023 दिवशी टाइगर-3. हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. रिपोर्ट्सनुसार टाइगर-3 मध्ये शाहरुख खानचा कॅमिओ रोल असणार आहे. शाहरुख खान आणि सलमान खान दुश्मनांच्या विरोधात लढताना दिसून येणार आहेत.