
मोहित सुरी दिग्दर्शित आणि अहान पांडे व अनित पद्ढा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'सैयारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे
18 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 17 दिवसांतच 299 कोटींपेक्षा जास्त कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही मोठ्या स्टारकास्टशिवाय या चित्रपटाने बजेटपेक्षा चार पट जास्त कमाई केली असून, आता तो 300 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच सामील होईल अशी अपेक्षा आहे. बॉक्स ऑफिसवर
चित्रपटाने त्याच्या १७ व्या दिवशी ८ कोटी रुपयांची कमाई केली आहे, जी शनिवारच्या तुलनेत चांगली वाढ दर्शवते. यामुळे 'सैयारा'चा एकूण कलेक्शन २९९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. चित्रपटाची एकूण ऑक्युपन्सी ३९.१०% असून, प्रेक्षकांचा प्रतिसाद आजही उत्तम असल्याचे दिसून येते.
या यशामागे आणखी एक विशेष बाब म्हणजे, 'सैयारा'ला अलीकडेच प्रदर्शित झालेल्या दोन मोठ्या चित्रपटांकडून स्पर्धेचा सामना करावा लागला. यामध्ये अजय देवगण आणि रवी किशन यांचा 'सन ऑफ सरदार २' तसेच सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा 'धडक २' यांचा समावेश आहे. मात्र, या नवीन चित्रपटांचा 'सैयारा'च्या कमाईवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही.
'सन ऑफ सरदार २'
अजय देवगणच्या सन ऑफ सरदार-२ चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 9.25 कोटी रुपयांची कमाई करत एकूण 24,75 कोटींचा टप्पा गाठला आहे.
'धडक २'
1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'धडक २' ने तिसऱ्या दिवशी 4.25 कोटींचा व्यवसाय केला असून, त्याचा एकूण कलेक्शन 11.50 कोटी रुपये झाला आहे.
एकूण कमाईच्या बाबतीत 'सैयारा' अजूनही 'सन ऑफ सरदार 2' आणि 'धडक 2' पेक्षा खूपच पुढे आहे, आणि 17 दिवसानंतरही त्याची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे.