मुंबई : होंबाळे फिल्म्सच्या ‘कांतारा’ ने आपल्या उत्कृष्ट कथेसह, व्हिज्युअल्स आणि पॉवर-पॅक्ड परफॉर्मन्सने दर्शकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाला अधिक यश मिळत आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून, दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या ऋषभ शेट्टीला देखील दर्शकांकडून प्रचंड प्रेम आणि प्रशंसा मिळत आहे. अशातच, ऋषभ शेट्टीने त्याच्या टीमसह मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. तसेच, 'कांतारा' स्टार ऋषभ शेट्टीला पाहण्यासाठी दर्शकांची मोठी गर्दी झाली.
ऋषभ शेट्टीच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देवस्थानला भेट देताना ऋषभ शेट्टीने पांढरा शर्ट आणि जीन्स परिधान केला होता. उत्तर भागातील 'कांतारा'च्या लोकप्रियतेचे हे स्पष्ट उदाहरण असून, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दिवसेंदिवस यशस्वी ठरत आहे. अलीकडेच, IMDb द्वारे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भारतातील टॉप 250 चित्रपटांच्या यादीतही या चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 'कांतारा' हा कला, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अपूर्व संगम आहे.