सावंतवाडी : संस्थानकालिन सावंतवाडीतील ओटवणे गावच देवस्थान श्री सातेरी रवळनाथ मंदिर येथे तुझ्यात जीव रंगला या घराघरात पोहोचलेल्या मालिकेतील सुप्रसिद्ध राणा व पाठक बाईंची जोडी अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी भेट दिली. देवालयात जात देव रवळनाथाचे आशीर्वाद त्यांनी घेतले. नुकतंच त्यांच लग्न पुण्यात पार पडल. छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अशी ही जोडी आहे.