अभिनेता अक्षय कुमार आणि जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरुचा यांचा आगामी राम सेतु चित्रपट सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमाराने एका आर्कियोलॉजिस्टची भूमिका साकारली आहे. जो आपल्या टीमसोबत राम सेतुच्या अस्तित्वाला वाचवण्यासाठी 7 हजार वर्ष जुन्या इतिहासाचा पडदा हटवताना दिसून येईल. या ट्रेलरमध्ये अक्षयच्या जबरदस्त अभिनयासोबतच धमाकेदार स्टंट सुद्धा पाहायला मिळत आहे. ‘राम सेतु’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ट्वीटवर अक्षय कुमारच्या या आगामी चित्रपटाला जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत.
एका युजरने ‘राम सेतु’च्या ट्रेलरवर प्रतिक्रिया देत लिहिलंय की, ट्रेलर चांगला आहे. अक्षय कुमार आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना चित्त थरारक अनुभव देणार आहे. मात्र, पिक्चर अजून बाकी आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, खूप छान ट्रेलर, जर स्क्रीनप्लेने काम केलं तर बॉलिवूडला दिवाळीमध्ये एक ब्लॉकबस्टर चित्रपट पाहायला मिळणार आहे. अभिषेक शर्मा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे.