राजू श्रीवास्तव यांच्या हृदयात यापूर्वी टाकले होते ९ स्टेंट

दोन वेळा केली अँजिओप्लास्टी
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: August 22, 2022 15:30 PM
views 286  views

मुंबई- प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना बुधवारी हृदयविकाराच्या झटका आल्याने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. इन्फेक्शन होऊ नये यासाठी सध्या त्यांना कोणालाही भेटू देत नाहीत. जवळपास १२० तासांपासून राजू यांना शुद्ध आलेली नाही. मात्र, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते प्रतिसाद देत असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. राजू श्रीवास्तव यांच्या शरीरात एक नवीन स्टेंट टाकण्यात आला आहे. रविवारी राजू श्रीवास्तव यांचा एमआरआय रिपोर्टही समोर आला, ज्यामध्ये डॉक्टरांना धक्कादायक बाब समोर आली. यासोबतच राजू यांचा भाऊ काजूही त्याच इस्पितळात दाखल असून त्यांच्यावरही डॉक्टर उपचार करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव हे आधीपासून हार्टचे पेशंट आहेत. डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी केली तेव्हा त्यांच्या हृदयाच्या एका मोठ्या भागात १०० टक्के ब्लॉक आढळले. राजू श्रीवास्तव यांनी यापूर्वीच शरीरात नऊ स्टेंट टाकले होते. तसेच अभिनेत्याची यापूर्वी अनेकदा अँजिओप्लास्टीही झाली आहे. 

 

राजू श्रीवास्तव यांच्या एमआरआय रिपोर्टमध्ये त्यांच्या प्रकृतीशी संबंधित एक मोठा खुलासाही समोर आला आहे. जो त्यांचा भाऊ दीपू यांनी जारी केला. माहिती देताना दीपू म्हणाले की, 'राजूचा एमआरआय रिपोर्ट आला आहे. ज्यामध्ये त्याच्या मेंदूच्या नसा दाबल्या गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना बरे होण्यासाठी आणखी १० दिवस लागू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.'