राजू श्रीवास्तव यांचं निधन

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: September 21, 2022 13:20 PM
views 271  views

मुंबई : गेल्या 41 दिवसांपासून मृत्यूच्या दारात असलेल्या विनोदवीर राजू श्रीवास्तव यांची झुंज अपयशी ठरली आहे. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण 41 दिवसांनंतरही त्यांनी शुद्ध आली नाही. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होते. पण राजू यांच्या निधनाची बातमी चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी आहे.