अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन

वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: August 31, 2025 10:47 AM
views 859  views

मुंबई : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे याचं निधन झाले आहे. प्रिया मराठे या मागच्या २ वर्षापसून कर्करोगाशी लढा देत होत्या. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

प्रिया मराठे यांनी अनेक मालिकेतील आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. सर्वाधिक गाजलेली हिंदी मालिका पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी काम केलं होतं. 'तुझेचं गीत मी गात आहे' या मालिकेत प्रिया मराठे यांनी काम केलं होतं. 'तू तिथे मी' या मालिकेतील त्यांचा अभिनय लोकांच्या मनात घर करून गेला. मराठी छोट्या पडद्यावर सगळ्यात गाजलेली मालिका 'चार दिवस सासूचे' यात प्रिया यांची प्रमुख भूमिका होती. A perfect murder या नाटकात त्यांनी काम केलं होतं. 

प्रिया मराठेने सकाळी चार वाजता मीरा रोड याठिकाणी अखेरचा श्वास घेतला. श्रीकांत मोघे यांची सून आणि शंतनू मोघेची पत्नी असणारी प्रिया मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती. अशीही माहिती समोर आली आहे की, ती गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. अभिनेत्री गेल्यावर्षीपासून सोशल मीडियावरही विशेष सक्रिय नव्हती. तिने शेवटची पोस्ट 11 ऑगस्ट 2024 रोजी केली होती. ज्यात तिने शंतनूसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

'या सुखांनो या', 'चार दिवस सासूचे', 'तू तिथं मी', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण', 'येऊ कशी कशी मी नांदायला' अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने 'तू तिथे मी', 'तुझेच मी गीत गात आहे'सारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारली होती. तिची 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतील मोनिका तुफान गाजली, पण ही मालिकाही तिने अर्ध्यात सोडली होती. याशिवाय 'पवित्रा रिश्ता', 'उतरन', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' अशा हिंदी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली.