कणकवली पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून नव्या कलावंतांना संधी !

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची ग्वाही | 'कनकसंध्या'ला उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 07, 2023 18:25 PM
views 381  views

कणकवली : कणकवली पर्यटन महोत्‍सवात सहभागी घेतलेले अनेक कलाकार पुढे नाटक, एकांकिका तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्‍टीमध्येही चमकले आहेत. त्‍याचधर्तीवर पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून नव्या कलावंतांनाही संधी मिळेल, अशी ग्‍वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.


कणकवलीतील दोनशेहून अधिक कलावंतांचा सहभाग असलेल्‍या कनकसंध्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन श्री.नलावडे यांनी केले. या कार्यक्रमावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, कविता राणे, सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, किशोर राणे, गटनेते संजय कामतेकर, ॲड.विराज भोसले, अभिजित मुसळे, रवींद्र गायकवाड यांच्यासह बंडू गांगण, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, बाळा सावंत, महेश सावंत आदी उपस्थित होते.


श्री.नलावडे म्‍हणाले, कणकवलीतील कलाकारांना त्‍यांच्यामधील कलाविष्कार सादर करता यावेत, यासाठी पर्यटन महोत्‍सवातील दुसरा दिवस आम्‍ही राखून ठेवत आहोत. या मिळालेल्‍या संधीचे अनेकांनी सोने केले आहे. नाटक, एकांकिकांमध्ये कलाकारांना संधी मिळाली. हिदी सिनेसृष्‍टीतही काम करण्याची संधी मिळाली. दरवर्षी आम्‍ही पर्यटन महोत्‍सव असाच सुरू ठेवणार आहोत. त्‍या माध्यमातून कलावंतांना नवे व्यासपीठ उपलब्‍ध होणार आहे.