NEW YEAR SPECIAL | उडान 2023 | जल्लोष नववर्षाचा ! शानदार प्रारंभ !

दीपक केसरकर मित्रमंडळाची सावंतवाडीकरांंना 'मेजवानी' ! 2022 ला 'बाय-बाय', नववर्षाच 'वेलकम' !
Edited by: विनायक गांवस
Published on: December 30, 2022 21:33 PM
views 361  views

सावंतवाडी : इनरव्हील महोत्सवाच्या पर्वणीनंतर दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून 'उडान महोत्सव २०२३ जल्लोष नववर्षाचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खाद्य जत्रेच्या जल्लोषासह मनोरंजनाची मेजवानी या महोत्सवाच खास आकर्षण असून शुक्रवारी उपविभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक,  दीपकभाई मित्रमंडळ व रोटरी क्लबच्या मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या मातोश्रींसह नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच निधन झाल्यानं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महोत्सवाची सुरुवात गणेश वंदनेन करण्यात आली. पहील्या दिवशी इचलकरंजी येथील वाद्य गायनाचा कार्यक्रम खास आकर्षण ठरला. 


पर्यटन महोत्सवाची उणीव भरून काढणारा इनरव्हील महोत्सव सावंतवाडीकरांसाठी पर्वणी ठरला होता. यानंतर दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून 'उडान महोत्सव २०२३ जल्लोष नववर्षाचा' या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. उपविभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अनारोजीन लोबो, तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षा रो. विनया बाड, रो. प्रमोद भागवत, रो. अनघा रामाणे, रो. प्रणय तेली यासह दीपकभाई मित्रमंडळ व रोटरी क्लबच्या मान्यवरांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. 


यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे म्हणाले, २० वर्षांपूर्वी मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पर्यटन महोत्सव सावंतवाडीत सुरू करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात याच अनुकरण करण्यात आलं. आज इनरव्हील महोत्सवानंतर इयर एंड गोड करण्यासाठी रोटरी क्लबनं उडान महोत्सवाच आयोजन केल आले आहे. माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो यांनी  नववर्षाच्या शुभेच्छा देत इनरव्हील, रोटरी क्लबच कौतुक केले. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मनोरंजनाच्या पर्वणीचा सावंतवाडीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तर निता सावंत-कविटकर यांनी तिनं दिवस इनरव्हील क्लबनं मनोरंजन केल्यानंतर आता नववर्षाची सुरुवात रोटरी क्लब करत आहे. कोरोनानंतर दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून दीपकभाई केसरकर मित्रमंडळ हा उपक्रम राबवत आहेत असं मत व्यक्त केले. रो. राजेश रेडीज यांनी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या कार्याची माहिती दिली. सेवाभावी संस्था म्हणून रोटरी क्लब काम करत असून समाजासाठी काम करणारी ही एक संस्था आहे. गेली ५० वर्ष अम्ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत. गरीब गरजूंसाठी काम करणारी ही संस्था आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मनोरंजनासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.


 रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षा रो. विनया बाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तीन दिवस खाद्यासह मनोरंजनाची मेजवानी शहरवासीयांना लुटावी, नववर्षाच स्वागत जल्लोषात कराव असं आवाहन केलं. रो. प्रणय तेली यांनी देखील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, अत्यंत कमी वेळात दिपकभाई मित्रमंडळान या महोत्सवाचे आयोजन केले. चविष्ट खाऊ गल्लीसह मनोरंजनाची मेजवानी सावंतवाडीकरांना उपलब्ध करून दिली. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा महोत्सव निश्चित यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रमुख अतिथी

सुभाष पुराणिक म्हणाले, मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच काम या महोत्सवातून होणार आहे. पुढील तीन दिवस मनोरंजनाच्या माध्यमातून नववर्षाच्या स्वागत आनंदात करावं अशा शब्दांत पुराणिक यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. 


यावेळी उप विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक, रोटरी क्लबच्या अध्यक्षा रो. विनया बाड, सेक्रेटरी प्रमोद भागवत, इव्हेंट रेअरमन अनघा रामाणे, निता गोवेकर, प्रणय तेली, इनरव्हील अध्यक्षा दर्शना रासम, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो,शहरप्रमुख बाबू कुडतरकर, महिला जिल्हा संघटक अँड. निता सावंत-कविटकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे आबा केसरकर, नंदू शिरोडकर, सुजित कोरगावकर, दत्ता सावंत, मिहीर मठकर, निकिता आराबेकर, गोविंद वाडकर, राजू पनवेलकर, साई हवालदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच सुत्रसंचालन संजय कात्रे यांनी केलं.


या कार्यक्रमात नववर्षाच्या स्वागतासाठी दररोज बहारदार गीत व नृत्यासह मनोरंजनाची मेजवानी चाखता येणार आहे. ३० डिसेंबर ते १ जानेवारी असे तीन दिवस सायं. ६.३० ते १०.३० या वेळेत हा महोत्सव होणार आहे. अस्सल मालवणी मेजवानीसह, चिकन, मटण, मंच्युरिअन, केक, भेळ, पाणीपुरी, उसळ, मिसळ, वडे सागोती, पुरणपोळी आईस्क्रीम, आंबोळी आदी खमंग, चमचमीत पदार्थांसह मनोरंजनाची चटकदार मेजवानी यावेळी चाखता येणार आहे.