
मुंबई - सुनीता आहुजाने अलीकडेच त्यांच्या यु-ट्यूब व्ही लॉगमध्ये गोविंदासोबत घटस्फोटाबाबत पुन्हा एकदा चर्चा केलीय. त्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. या कपलमधील सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सुनीता आहुजा यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे म्हटले जाते. यानंतर कोर्टाने न्यायालयाने गोविंदाला समन्स बजावल्याचे म्हटले गेले. परंतु, तो प्रत्यक्ष हजर राहिला की नाही, हे अद्याप समोर आलेले नाही.
एका वेबसाईटने गोविंदाचे वकिलांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी उत्तर दिले, "कोणतीही केस नाही, सर्व सेटल होत आहे, हे सर्व लोक जुने विषय काढत आहेत.
एका जुन्या मुलाखतीत, निहलानी यांनी गोविंदा यांच्या तथाकथित अफेअर्सबद्दलच्या अफवांना उत्तर दिले होते. ते म्हणाले की, ''सुनीता आणि गोविंदा यांच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. त्यांनी असेही म्हटले होते की, त्यांचे लग्न दहा अफेअर्स असले तरी टिकेल.''
एका रिपोर्टनुसार, निहलानी यांनी स्पष्ट केले की, गोविंदा आणि सुनीता नेहमीच वेगळे राहत असत. गोविंदा रात्री उशिरापर्यंत असल्याने तो वेगळ्या बंगल्यात बैठका घेत असे, तर सुनीता त्याच्या शेजारी राहते.
पहलाज निहलानी यांनी कबूल केले की, ते आता या कपलच्या नियमित संपर्कात नाहीत. अलिकडे जेव्हा गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती, त्यानंतर ते गोविंदाला भेटले होते. त्यांनी गोविंदा आणि सुनीता यांना "सर्वात चांगले मित्र" म्हटले होते.
गोविंदाच्या मॅनेजरने एका हिंदी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा - सुनीता घटस्फोट घेत नाहीयेत. सुनीताने कोणतीही घटस्फोटासाठी फाईल केली नाही. घटस्फोटाच्या चर्चा निराधार आहेत.