ठाणे : विद्यार्थी विकास कला अकादमी व अखिल भारतीय कला, क्रीडा, सांस्कृतिक अकादमी, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सांस्कृतिक कला गौरव संमेलन डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात, ठाणे इथं संपन्न झाले.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, माईण नंबर १ च्या उपक्रमशिल पदवीधर शिक्षिका प्रतिक्षा प्रसाद तावडे यांना सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांच्या हस्ते शाल, मानचिन्ह, मानपत्र, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन जयेंद्र करडे (आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस खेळाडू) तथा अध्यक्ष निवड समिती यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्कारामुळे मला अधिक प्रेरणा मिळाली असून आपली जबाबदारी वाढली आहे, असे त्या म्हणाल्या.