चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला असून 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये अनेक कलकारांना पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेता अल्लू अर्जुनला ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आलिया व्यतिरिक्त अभिनेत्री कृती सेननला देखील मिमीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर आलियाने आनंद व्यक्त करत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.