कुडाळमध्ये सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक 'ई-ॲक्सेस'ची एन्ट्री

श्री विनायक सुझुकीत बुकिंगला सुरुवात
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 25, 2026 20:15 PM
views 104  views

कुडाळ: दुचाकी प्रेमींची लाडकी स्कूटर 'सुझुकी ॲक्सेस' आता इलेक्ट्रिक अवतारात कुडाळवासीयांच्या भेटीला आली आहे. श्री विनायक सुझुकी, कुडाळ येथे सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर 'ई-ॲक्सेस' (e-Access) चे मॉडेल दाखल झाले असून, या गाडीच्या बुकिंगला जोरदार सुरुवात झाली आहे. या नव्या मॉडेलला ग्राहकांकडून पहिल्या दिवसापासूनच उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे शोरूमकडून सांगण्यात आले आहे.

सुझुकी ई-ॲक्सेस ही स्कूटर प्रगत तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: ९५ किमी रेंज: ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल ९५ किमीपर्यंतचा प्रवास सहज करू शकते. LFP बॅटरी तंत्रज्ञान: गाडीमध्ये अत्याधुनिक LFP बॅटरी वापरण्यात आली असून, तिचे आयुष्य सामान्य बॅटरीपेक्षा ४ पटीने अधिक आहे. स्मूथ पिकअप: नॅचरल राइड फीलसाठी यामध्ये 'सिंक्रोनाइझ्ड थ्रॉटल रिस्पॉन्स' देण्यात आला आहे, ज्यामुळे राइड अतिशय सुखद होते. सातत्यपूर्ण पॉवर: बॅटरी कमी असतानाही गाडीच्या वेगावर परिणाम होत नाही, ती सतत योग्य पॉवर डिलिव्हरी देते.

मेंटेनन्स-फ्री बेल्ट ड्राइव्ह: गाडीच्या देखभालीचा खर्च कमी करण्यासाठी यामध्ये बेल्ट ड्राइव्ह सिस्टीम देण्यात आली आहे. स्मार्ट डिस्प्ले: यामध्ये मल्टी-इन्फॉर्मेशन कलर TFT डिस्प्ले आहे, जो गाडीची सर्व माहिती स्पष्टपणे देतो. आकर्षक डिझाइन: १२-इंच फ्रंट आणि रिअर टू-टोन इफेक्ट व्हील्समुळे गाडीला प्रीमियम लूक मिळाला आहे.

सिद्धिविनायक सुझुकी शोरूम तर्फे या गाडीचे लवकरच 'लॉन्चिंग' देखील करण्यात येणार आहे. सध्या या गाडीच्या खरेदीवर विविध आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. "सुझुकीची विश्वासार्हता आता इलेक्ट्रिक रूपात उपलब्ध झाली आहे. पर्यावरणापूरक आणि खिशाला परवडणारी अशी ही ई-ॲक्सेस पाहण्यासाठी आणि बुकिंगसाठी ग्राहकांनी शोरूमला भेट द्यावी," असे आवाहन सिद्धिविनायक सुझुकी, कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.