
मुंबई : मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये भीषण आग लागली आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेल्या आगीत 'अनुपमा' या मालिकेचा सेट जळून खाक झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. सुदैवाची बाब म्हणजे काल रविवारी असल्याने 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर शूटिंग बंद होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनुपमा मालिकेचा सेट आगीच्या भक्षस्थानी पडल्याने जळून खाक झाला. नियोजित वेळेनुसार आज 'अनुपमा' मालिकेचे चित्रीकरण होणार होते. मात्र, या आगीमुळे मालिकेच्या चित्रीकरणाला फटका बसू शकतो. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आरे पोलिस या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहेत.