
ब्युरो न्यूज : ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.१ ऑगस्ट रोजी राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय मिडिया सेंटरमध्ये या संदर्भात यादी जाहीर करण्यात आली . सायंकाळी ६ वाजता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आश्विन वैष्णव यांनी पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली. मराठी सिनेमा विश्वातील ३ सिनेमांनी यात आपली छाप सोडली . यात सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा 'शामची आई' ह ठरला. तसेच सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा म्हणून नाळ -२ या चित्रपटाने बाजी मारली . सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक म्हणून आत्मपॅम्पल चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष भेंडे यांची निवड झाली .
सर्वोत्कृष्ट सिनेमा ( श्यामची आई ) - १९ ऑगस्ट २०२१ रोजी एका प्रमोशनल पोस्टरद्वारे या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या सिनेमाचे मुख्य छायाचित्रण ६ एप्रिल २०२२ रोजी कोकणातील पावस येथे सुरू झाले. तसेच अजून एक चित्रीकरण मे २०२२ मध्ये कोल्हापूरमधील पन्हाळा येथेही झाले.हा चित्रपट 10 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.या चित्रपटाचे दिग्दर्शित सुजय डहाके हे आहेत.ओम भुतकर याने श्यामची भूमिका साकारली आहे तर तरुण श्याम म्हणून शर्व गाडगीळ याने अभिनय केला आहे.यशोदा म्हणजेच श्यामच्या आईच्या भूमिकेत गौरी देशपांडे या आहेत.
सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा- 'नाळ २' - नाळ- २ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यक्कांती यांनी केलं आहे तर याची निर्मिती नागराज मंजुळे यांनी केली. हा सिनेमा १० नोव्हेंबर २०२३ प्रदर्शित करण्यात आला.या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत श्रीनिवास पोकळे या लहान मुलाने अतिशय सुंदर काम केले ,त्यामुळे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.या चित्रपटाला संगीत ए.व्ही. प्रफुल्लचंद्र, अद्वैत नेमळेकर यांनी दिले.नाळ -२ मधील गाण्यांनी देखील प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली .या चित्रपटात नागराज मंजुळे यांनी मुख्य भूमिका साकारली तर देविका दफ्तरदार,जितेंद्र जोशी,,दीप्ती देवी,त्रिशा ठोसर,भार्गव जगताप यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत.
सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक- आशीष भेंडे 'आत्मपॅम्पलेट' - मराठी सिनेमा विश्वात नावाजलेला सिनेमा म्हणून ओळखला जाणारा 'आत्मपॅम्पलेट' हा चित्रपट . सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक म्हणून आशीष भेंडे यांनी हा पुरस्कार जिंकला आहे.या चित्रपटाची पटकथा परेश मोकाशी यांची असून छायाचित्रण सत्यजित शोभा श्रीराम यांनी केले आहे.या चित्रपटाला ७३व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जनरेशन १४प्लस पुरस्कारासाठी याला नामांकन मिळाले.या नंतर आता ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कायामध्ये सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शकसाठी नामांकन मिळाले.
या वर्षीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अतिशय महत्वाचा ठरला आहे.