मुंबई : प्रायोगिक रंगभूमीवर येणाऱ्या प्रत्येक नाटकाने रंगभूमीला मनोरंजन सृष्टीला काही ना काही दिल आहे. एकांकिका स्पर्धा असो वा मग प्रायोगिक रंगभूमी इथून घडणार नवीन तरुण कलाकार यांच्याकडे सातत्याने मनोरंजनसृष्टी लक्ष देऊन असते. लवकरच रंगभूमीवर दाखल होणाऱ्या ‘अरे ला कारे’ या प्रायोगिक नाटकाने आता मनोरंजन सृष्टीचे लक्ष वेधलं आहे. त्याच कारण ही तसंच खास आहे आणि ते कारण म्हणजे महेश मांजरेकर. मनोरंजन सृष्टीतील महत्वाचा भाग असलेले महेश मांजरेकर हे ‘अरे ला कारे’ हे नाटक प्रस्तुत करत आहेत. तर या नाटकात प्रमुख भूमिकेत रोहन गुजर हा असून त्याच्या व्यतिरिक्त एक अजून एक मुख्य पात्र या नाटकात आहे. ते पात्र म्हणजे या ‘पाडा नंबर ४’.
‘एकांकिका स्पर्धा आणि प्रायोगिक रंगभूमीवर चालणाऱ्या घडामोडीकडे तिथल्या नवीन तरुणाकडे आमचं नेहमीच लक्ष असत त्यांनी आमच्या सोबत येऊन काम करावं ही इच्छा असते, नव्या पिढीकडून काही तरी नवीन घडत असताना या मनोरंजन सृष्टीने पाठीशी उभं राहायला हवं आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे असं महेश मांजरेकर सांगतात.एकांकिका ते प्रायोगिक असा प्रवास करणार हे नाटक राजरत्न भोजने या तरुण कलाकाराने लिहिलं आणि दिग्दर्शित केलं आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या पण दुर्लक्षित घटकाकडे आपल लक्ष वेधून घेणार हे प्रायोगिक नाटक आहे. ‘अरे ला कारे’ या नाटकाची प्रक्रिया गेल्या वर्ष भरापासून सुरु असून या नाटकाची निर्मिती वरून सुखराज हा तरुण लेखक दिग्दर्शक करत असून आता तो रंगभूमीवर निर्माता म्हणून पदार्पण करतो आहे. या प्रायोगिक नाटकाच्या निमित्ताने मालिका व्यावसायिक नाटक या दोन्ही माध्यमात सध्या चर्चेत असलेला अभिनेता ‘रोहन गुजर’ या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या २५ डिसेंबर रोजी यशवंत नाट्यमंदिर येथे होणार आहे.