
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कुडाळचे सुपुत्र, श्री. महेश गुरुनाथ कुडाळकर यांना 'उनाड' या चित्रपटातील उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. भैरववाडी, कुडाळ येथील रहिवासी असलेले महेश कुडाळकर यांनी कुडाळ हायस्कूलमधून शिक्षण घेतले आहे.
आपल्या कलात्मक दृष्टीने आणि मेहनतीने त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार केवळ त्यांचाच नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्यांच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यातील कला क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक उदयोन्मुख कलाकारांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही.