कुडाळ : कोकणचा महाडान्सर ह्या भव्य दिव्य डान्स स्पर्धेच्या निमित्ताने कुडाळ शहरात आलेल्या मराठी आणि हिंदी सिने सृष्टीतील सुपरस्टार अभिनेता संतोष जुवेकर यांचे कविलकाटे वासियांनी कुडाळ रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत केल. यावेळी गग्रामस्थ मंडळींसह चित्रपट निर्माते - दिग्दर्शक साईनाथ जळवी उपस्थित होते.
दि. 23 रोजी ही स्पर्धा कविलकाटे इथं होत आहे. कोकणचे नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE या स्पर्धेचे मीडिया पार्टनर आहे. या स्पर्धेसाठी मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार येत आहेत. त्यामध्ये मराठी आणि हिंदी सिने सृष्टीतील डॅशिंग अभिनेता संतोष जुवेकर यांचा समावेश आहे. त्यांचं या स्पर्धेसाठी कोकणात आज आगमन झालं. त्यांचं शानदार स्वागत करण्यात आलं.