सावंतवाडी : सावंतवाडी संगीत मित्रमंडळाचे कलाकार 'एक शाम मदन मोहन के नाम' हा कार्यक्रम सादर करणार आहेत. संगीतकार मदन मोहन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक ५ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता कळसुलकर इंग्लीश स्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम सादर होणार आहे.
मदनमोहन हे हिन्दी गझल आणि वैचित्र्यपूर्ण संगीत रचनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यानी संगीतबद्ध केलेली गाणी ही चोखदळ श्रोत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. कार्यक्रमासाठी संगीतसाथ सिंथसायझर शाम तेंडोलकर, ढोलक श्री. भाई तेरसे व संकेत म्हापणकर, तबला - अक्षय सरवणकर तर हार्मोनिअम किरण सिद्धये यांची असणार आहे. तसेच कार्यक्रमाचे निवेदन संजय कात्रे आणि सौ. गायत्री देशपांडे करणार असून ध्वनीक्षेपण व्यवस्था हेमंत मेस्त्री (पडेलकर) संभाळतील. हा कार्यक्रम सर्वाना खुला असुन सर्व रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद ना. चोडणकर यांनी केली आहे.