मित्रांना फोन केला ; जीवाला कंटाळल्याचं सांगितलं ; गीतेशने स्वतःला संपविलं

Edited by: विनायक गांवस
Published on: March 18, 2026 17:38 PM
views 172  views

सावंतवाडी : नेमळे कुंभारवाडी येथील गीतेश भिवा राऊळ या युवकाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

गीतेश राऊळ हा नेमळे गावकर कुंभारवाडीत आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. गेल्या तीन ते चार वर्षापासून तो कंबरेच्या आजाराने त्रस्त होता. अलीकडेच त्याच्या कंबरेवर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, शस्त्रक्रिया करूनही बरे वाटत नसल्याने पुढील शस्त्रक्रीयेसाठी पैसे कुठून आणणार या चिंतेने त्याने पहाटे वाडीतीलच दोन मित्रांना फोन करून मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे असा फोन केला. मात्र, मित्र घरी येईपर्यंत गीतेश याने गळ्याला दोरीने फास लावून स्वतःला संपविले.

त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय, दोन पुतण्या एक, पुतण्या असा परिवार आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, पोलिस दीपक शिंदे, निलेश मोरबाळे आदी करत आहेत.