ब्युरो न्यूज : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा धाकटा मुलगा बॉबी देओलची फिल्मी कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. बॉबी देओलने आपल्या २३ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये ४४ सिनेमांमध्ये काम केले पण फक्त ३ सिनेमा हिट ठरले. असे असूनही, बॉबी देओल आज सुमारे २०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे आणि लक्झरी जीवन जगतो. नुकताच त्याच्या ‘अॅनिमल’ सिनेमातील अभिनयामुळे पुन्हा त्याने चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली.
गेल्या काही काळापासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर बॉबी देओलचे नशीब चमकत आहे. बॉबी देओल त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी २ ते ४ कोटी रुपये घेतो. यासोबतच बॉबी देओलचे मुंबईत सुहाना आणि समप्लेस एल्स नावाचे दोन चायनीज रेस्टॉरंट आहेत, ज्यातून तो चांगली कमाई करतो. बॉबी देओल आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील जुहू भागातील एका आलिशान बंगल्यात राहतो. याची किंमत सुमारे ८ कोटी रुपये आहे. याशिवाय पंजाबमध्ये त्यांचे एक आलिशान फार्महाऊस देखील आहे जेथे अनेक वेळा पार्ट्या आयोजित केल्या जातात. बॉबी देओलची पत्नी तान्या हिचा 'द गुड अर्थ' नावाचा स्वतःचा फर्निचर आणि होम डेकोरेशनचा व्यवसाय आहे. अनेक बॉलीवूड स्टार आणि बिझनेसमन त्यांचे क्लायंट आहेत. २००५ मध्ये रिलीज झालेल्या 'जुर्म' आणि २००७ मध्ये रिलीज झालेल्या 'नन्हे जैसलमेर' या सिनेमासाठीही तान्याने कॉस्च्युम डिझायनिंगचे काम केले होते. त्यासोबतच ट्विंकल खन्नाच्या 'व्हाइट विंडो' स्टोअरमध्ये तान्याचे डिझाईन केलेले फर्निचर आणि इंटीरियर डेकोर सामान विकले जाते.बॉबी देओलला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. त्याच्या महागड्या कार कलेक्शनमध्ये लँड रोव्हर, फ्रीलँडर २, रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, पोर्श केयेन यांसारख्या आलिशान कारचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉबी देओल दरवर्षी सुमारे ८ कोटी रुपये कमावतो.