ब्युरो न्यूज : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा हिचा 18 नोव्हेंबर रोजी बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा झाला. एंगेजमेंटच्या 10 दिवसांनंतर तिने या सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आयरा तिचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत तिचा हा खास दिवस एन्जॉय करताना दिसत आहे. या सर्व छायाचित्रांमध्ये आयरा आणि तिचा सावत्र भाऊ आझाद यांचा एक फोटो आहे, ज्यामध्ये ते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. भाऊ-बहिणीचा हा फोटो अतिशय क्यूट आहे.
आयराने शेअर केले इमोशनल कॅप्शन
फोटो शेअर करताना आयराने भावूक कॅप्शनमध्ये लिहिले - मला यापूर्वी कधीही इतके सुंदर वाटले नव्हते. पण तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता. मला राजकन्येसारखे वाटले. त्या दिवशी प्रत्येक अँगले माझे फोटो काढले गेले. मी कोणत्याही अँगलने फोटो क्लिक करु शकत होते. मला या दिवशी सुंदर दाखवण्यासाठी @colee_khan_affonso आणि हा खास दिवस कॅप्चर केल्याबद्दल @etherealstudio.in यांना धन्यवाद.'
एक नजर टाकुया आयराच्या या सुंदर फोटोंवर...