सावंतवाडी : सन मराठी वरील क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मालिका सोमवार दि.१७ जुलै पासून सोमवार - शनिवारी सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. या मालिकेचे कलाकार सावंतवाडी शहरात मोती तलावाच्या काठावर आरती करून वैश्यभवन येथे प्रीमियर शो करणार आहेत.
सन मराठी वाहिनीकडून सावंतवाडी मँगो हॉटेल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आनंदी सोहळा या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली.महिलांच्या धकाधकीच्या आयुष्यात थोडा विरंगुळा मिळावा हा मुख्य उद्देश असल्याचे कार्यक्रमाचे निवेदक आशिष पवार यांनी माहिती दिली.
या सोहळ्यात महिलांनी आपल्या मधील कला सादर करायला दिली जाणार असून यात उत्तम कला सादर करणाऱ्या महिलांना बक्षीस देण्यात येणार आहे.कले बरोबर महिलांसाठी खेळही खेळायला मिळणार आहे.आनंदसोहळा मधील महिलांची सादर केलेली कला यू ट्यूब च्या माध्यमातून प्रसारित केले जाणार आहेत.भविष्यात महिलांसाठी मालिका सुरू करुन हक्काचा व्यासपीठ दिल जाणार आहे.या कार्यक्रमात महिलांच्या कला गुणांना वाव देण्यात येणार आहे.तसेच भरघोस बक्षिसे व भेटवस्तू देऊन महिलांना सन्मानित करण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितलं.हा कार्यक्रम वैश्यभवन येथे १७ जुलै ला संध्याकाळी ७ वाजता आयोजित केलं असून यामध्ये महिलांनी मोठय़ा सख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आनंदी सोहळा चे निर्माते विनय नलावडे यांनी माहिती दिली. या पत्रकार परिषदेत आशिष पवार,विनय नलावडे,वैभव केंकरे उपस्थित होते.
आनंदी सोहळा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहेत. या ५५० खेड्यात पोहचून महिलांच्या जीवनात विरंगुळा म्हणून सन मराठी वरील आनंदी कार्यक्रम होणार आहे . तसेच आरवली येथील श्री देव वेतोबा जागृत देवस्थान आहे. यावर आधारित वेतोबा मालिका सोमवार पासून भेटीला येत आहे, असे आशिष पवार यांनी सांगितले.मोती तलावाच्या काठावर सोमवारी सायंकाळी ५ वाजता आरती होऊन नंतर वैश्य भवन मध्ये सर्व कलाकारांची भेट होईल असे त्यांनी सांगितले.