मुंबई- गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'कंतारा' या सिनेमाने ने आश्चर्यकारक कामगिरी करुन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. आता होंबळे फिल्म्स आणखी एक अप्रतिम चित्रपट घेऊन येत आहे तो म्हणजे 'कंतारा चॅप्टर १'. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून तो खूपच रोमांचक आणि अंगावर काटा आणणारा आहे. या टीझरमध्ये, अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी एका भयानक अवतारात दिसत आहे. या टीझरमध्ये सामान्य जीवनापेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या जगाची झलक आहे. यासोबतच या वेळीही पहिल्या भागात असलेली गर्जना अजूनही कायम आहे.
या टीझरमध्ये ऋषभ शेट्टीची व्यक्तिरेखा अनेक रहस्ये आणि रोमांचानी वेढलेली पाहायला मिळते. चित्रपटाचे संगीत अतिशय आकर्षक आणि हृदयस्पर्शी आहे. चित्रपटाच्या संगीतासोबतच हा चित्रपट सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 'कंतारा'ने गेल्या वर्षी सर्व सिनेमागृहात तुफान माजवले होते. मानवता आणि निसर्ग यांच्यातील गुंतागुंतीचे नाते दाखवणाऱ्या लोककथेवर आधारित या सिनेमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. होंबळे फिल्मस् संपूर्ण भारतातील कंटेट दाखवण्यासाठी प्रसिद्ध आबे. कातांरा चॅप्टर १ द्वारे ते आपली कला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.