
मुंबई - जॉली एलएलबी ३ ला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. अक्षय कुमार-अरशद वारसीच्या जॉली एलएलबी ३ मध्ये CBFC ने काही बदल करत २ तास ३७ मिनिटांच्या चित्रपाटला U/A 16+ सर्टिफिकेट दिलं आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. दरम्यान, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी ३' चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये २ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सुभाष कपूरचा जॉली एलएलबी चित्रपटाच्या ट्रेलरने उत्साह निर्माण केला आहे. या चित्रपटात गजराज राव, हुमा कुरेशी आणि इतर कलाकार आहेत. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून या चित्रपटाने आधीच ६२.९७ लाख रुपये कमावले आहेत.
जुने डिस्क्लेमर ऐवजी नवे डिस्क्लेमर दाखवण्यास सांगितले आहे. जिथे जिथे दारू ब्रँड दृश्य आहेत, ते ब्लर (अस्पष्ट) करण्यात आले आहेत. चित्रपटाची सुरुवात काल्पनिक ठिकाण आणि वर्षाचा उल्लेख जोडण्यात आले आहे. अपशब्द ‘f**r’ चित्रपटातून हटवून पोलिसकर्मचाऱ्यांद्वारे एका बुजुर्गवर हल्ल्याच्या सीनमध्ये सुधारणा करण्यात आले आहे.
एक डायलॉग बदलून ‘इमरजेंसी क्लॉज’ करण्यात आले आहे. सोबतच त्या सीनमध्ये दाखवण्यात आलेल्या लोकांना देखील बदलण्यात आले आहे. सीता (सीमा बिस्वास) द्वारा दाखवण्यात आलेली फाईलवर असलेला लोगो ब्लर करण्यात आला आहे. सेकंड हाफमध्ये एक संवाद बदलण्यात आला आहे. - “जानकी अम्मा का गांव सिर्फ़ एक...चेक मुंह पर फेंक के मारा”.
आतापर्यंत चित्रपटाने १९ हजारहून अधिक तिकिटे विकली असून ६२.९७ लाख रुपये कमावले आहेत. कालपर्यंत चित्रपटाने फक्त ७००० तिकिटे विकली आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन २ कोटी झाले असून ३५०० हून अधिक शोज मिळाले आहेत.