मुंबई : सध्या जान्हवी कपूर ही मालदीवमध्ये क्वालिटी टाईम घालवत आहे. जान्हवी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सतत मालदीवमधील फोटो शेअर करत आहे. जान्हवीने पिवळ्या रंगाच्या बिकिनीवरून खास फोटोशूट आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले होते. या फोटोशूटमध्ये जान्हवीचा लूक एकदम बोल्ड दिसत होता. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूरचा मिली हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर अर्थात जान्हवीच्या वडिलांनीच केली होती. मात्र, मिली चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.
मिली चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर प्रचंड चर्चा होती. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिने चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये कोणतीच कसर सोडली नाही. तरीही चित्रपटाला खास कमाई करण्यात यश मिळाले नाही.
सध्या जान्हवी ही मालदीवमध्ये असून सुट्टीचा आनंद घेत आहे. मात्र, यावेळी सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली असून जान्हवी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत मालदीवला गेल्याचे सांगितले जात आहे.
जान्हवी कपूरच्या फोटोंवरून चाहते अंदाज लावत आहेत की, एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्याबरोबर जान्हवी ही मालदीवमध्ये आहे. शिखर आणि जान्हवीचे काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते.
जान्हवी कपूर हिने शेअर केलेल्या फोटोंवर देखील चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करून विचारताना दिसत आहेत की, जान्हवी तू शिखरसोबत मालदीवला गेली आहे का? जान्हवीच्या मालदीवच्या फोटोवर विशेष म्हणजे शिखर यानेही कमेंट केलीये.
शिखर पहाडिया याने समुद्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे त्यानेही रात्रीच्या वेळेचेच फोटो शेअर केले आहेत. यामुळेच चाहते अंदाज बांधत आहेत की, जान्हवी आणि शिखर दोघेही मालदीवमध्ये आहेत.