'जय जय विघ्नेश्वरा' नवं गीत येतंय आपल्या भेटीला !

Edited by: ब्युरो
Published on: September 25, 2023 15:31 PM
views 1185  views

सिंधुदुर्ग : गणेशोत्सव म्हणजे कोकणवासियांच्या जिव्हाळयाचा विषय. मुंबई, पुणे या शहरात उत्साहात साजरा केला जातो, त्यापेक्षा कणभर अधिक प्रमाणात गावात, खेड्यापाड्यात भक्ती भावाने साजरा केला जातो. गणपतीच्या आगमनाची चाहूल लागताच ते अगदी विसर्जनाचा दिवस उजाडे पर्यंत बालगोपाळात एक उत्साह वाढत चाललेला असतो. भजन, कीर्तन, भारुड यासारख्या लोककलेच्या माध्यमातून खेडोपाड्यात गणपती गजाननाचे स्वागत केले जाते. 

गणरायाचे मनोभावे पूजन करत असताना हर एक शब्दातून गणराया प्रति स्तुतीसुमने उधळली जातात. अशाच काहीशा आशयाचे एक नवीन गीत 26 सप्टेंबर 2023 आपल्या भेटीस येत आहे. श्वेता पेडणेकर यांची रचना असलेले जय जय विघ्नेश्वराय हे गीत स्वस्तिक म्युजिक स्टुडिओ वालावल यांच्या माध्यमातून प्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे यांच्या आवाजात संगीतकार दिनेश वालावलकर यांनी संगीतबद्ध केलेल आणि ध्वनीमुद्रक कुणाल भगत यांचे नवीन गीत आपल्या भेटीस  घेऊन येत आहे.

राहुल पारकर, श्वेता पेडणेकर, निलेश गुरव यांनी या गीताची निर्मिती केली असून सहनिर्माता म्हणून विजय वालावलकर यांनी याचे काम पाहिले आहे. या गीताचे चित्रीकरण मिलिंद आडेलकर, आदित्य येरम, संकेत जाधव यांनी केले असून दिग्दर्शन किशोर नाईक आणि विजय वालावलकर यांचे आहे. संकलन प्रथमेश धुरी, डी कलरिस्ट संकेत जाधव, प्रकाशयोजना SPK लाईट्स, सचिन कोंडस्कर, जयतीर्थ राऊळ यांनी केली आहे.

या गीताचे नृत्य दिग्दर्शकन सिने कोरुओग्राफर आदेश वैद्य, मुंबई यांचे असून मेकअप शीतल केरकर, ध्वनी चिन्मय परब, सुबोध नाईक यांचे आहे. तेजस पिंगुळकर, रुचिता शिर्के , भूषण बाक्रे, प्रीती नेमळेकर, यांच्या सोबत क्षेत्रपाल श्री  देव बेतोबा फेम विवेक वाळके (भोळामामा)आणि निलेश गुरव (पोलीस पाटील ) "छोट्या बायोची मोठी स्वप्न फेम"  रुची नेरूरकर (छोटी बयो), सचिन गुंड  राहुल पारकर, आरव आईर, आर्यन टेम्बुलकर, साहिल सिंग, सुजय जाधव, आर्यन चव्हान, तन्मय आययर, दीक्षा नाईक, संजना पवार, प्रतिक्षा, विशाखा धामपूरकर, तनिषा नाईक, श्रीधर, भार्गवी राणे, मनश्री माड्ये, दीपिका वाकर या कलाकारांचा यात समावेश आहे. 

या गीताचे पोस्टर संकेत जाधव यांनी केले असून, रोहन नेरुरकर यांनी याचे डिझाइन केले आहे. विशाल लोहार, प्रसाद बिडये यांनी संपूर्ण गीताचे छायाचित्रण केले असून . डॉ. प्रणव प्रभू, तेजस मस्के, राजा शृंगारे, ओंकार परब, सायली केसरकर, डॉ. शर्वती शेट्टी यांनी हे गीत आपणा सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले आहेत तर विशेष साहाय्य सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान आणि चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ यांचं लाभलं. 

या गीताची सर्वत जोरदार चर्चा होत असून दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता स्वस्तिक म्युजिक स्टुडिओ या युट्युब चॅनेलवर हे गीत प्रसारित करण्यात येणार आहे. कोकणातील सर्व कलाकारांनी एकत्र येऊन सिंधुदुर्गचा राजा समोर सादर केलेल्या या आविष्काराला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन विजय वालावलकर यांनी केले आहे.