गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर करणार राडा!

‘घुंगरु’ चित्रपटात मिळाली संधी
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 24, 2022 16:37 PM
views 461  views

मुंबई : गौतमी पाटील हे नाव सध्या मनोरंजन विश्वात चांगलचं गाजत आहे. गौतमी पाटील हे नाव माहित नसलेले असे खूप क्वचितच असतील. 'लावणी क्वीन' म्हणून ती प्रसिद्ध झाली आहे. गौतमीच्या नृत्यावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर आणि फॅशनवर देखील चाहते फिदा आहेत. तिच्या नृत्यामुळे ती सर्वांना भुरळ घालते.

तिचा कार्यक्रम कुठेही असला तरी तेथे हमखास गर्दी होतेचं. मात्र तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी होत असतांनाच आता गौतमीने एक मोठी घोषणा केली आहे. आता ती लवकरचं मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

महाराष्ट्रातील तरुणांईला नृत्यांने भूरळ पाडणारी गौतमी ही आता तिचा लवकरच चित्रपटात झळकणार आहे. ती मोठ्या पडद्यावर जलवा दाखवणार आहे. तिने स्वत:च ही बातमी चाहत्यासोबत ही बातमी शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वीच गौतमीला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नावं ‘घुंगरु’.

“माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका काय असेल हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचं शूटींग सुरु आहे. चित्रपटाचं शूटींग पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीखेची घोषणा करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा” असेही आवाहन तिनं केलं.