मुंबई : राज्यभर एका नावाची खूपच चर्चा असेत ते नाव म्हणजे 'सबसे कातील गौतमी पाटील'. गौतमीच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी असते. तरूणाईपासून ते अगदी नोकदार वर्गापर्यंत प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडली आहे. गौतमी पाटीलची नेहमी वेगवेगळी गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी 'तिचं दिलाचं पाखरू' हे गाणं रिलीज झालं. आता नुकतचं गौतमीचं घोटाळा झाला हे गाणं प्रक्षेकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातील नृत्यांनी तीने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे.
गौतमीच्या दिलाचं पाखरू, माझा कारभार सोपा नसतोय, सरकार तुम्ही केलं मार्केट जाम, पाटलांचा बैलगाडा या गाण्यांना प्रेक्षकांनी चांगली पसंती मिळाली. गौतमी तिचे अनेक व्हिडीओ, फोटो तिच्या गाण्यांचे व्हिडीओ नेहमीच सोशल मिडीयावर पोस्ट करत असेत. गौतमीला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. तिच्या सोशल मिडीयावरील पोस्टला नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. तर काही नेटकरी तीला ट्रोल देखील करत असतात.
सध्या गौतमी पाटीलचं घोटाळा झाला हे गाणं चर्चेत आहे. गौतमीचं घोटाळा झाला. हे गाणं वैष्णवी आदोडेनं गायलं आहे. तर संकेत मेस्त्रे हे या गाण्याचे गीतकार आहेत. अतुल भालचंद्र जोशी आणि सिद्धेश कुलकर्णी यांनी या गाण्याला संगीत दिलं. घोटाळा झाला या गण्यामध्ये गौतमीने काळ्या रंगाची साडी, मोकळे केस आणि गोल्डन ज्वेलरी असा लूक केला आहे. हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हारल होत आहे.