मुंबई : 96 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्यांनी मालवणी भाषेचा झेंडा आपल्या वस्त्रहरण या नाटकाच्या माध्यमातून अटकेपार फडकविला असे प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या पत्नी सौ विजया गवाणकर यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्या आपल्या मुलांसोबत दहिसर मुंबई येथे राहत होत्या. शुक्रवारी मुंबई येथे त्यांची प्राणज्योत मालवली. नाटककार गंगाराम गवाणकर हे आपल्या राजापूर तालुक्यातील माडबन या गावी गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास आहेत आज सायंकाळी त्यांच्यावर दौलत नगर बोरिवली पूर्व येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे .