2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाला त्या काळी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास करोडोंची कमाई केली होती. अनिल शर्मा यांच्या या चित्रपटाचे यश पाहून यंदा या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘गदर 2’ देखील प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सध्या या चित्रपटाबाबत अनेक नवनवीन अपडेट समोर येत आहेत. नुकतच या चित्रपटतील ‘मैं निकला गड्डी लेके’ गाणं प्रदर्शित झालं आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘गदर 2’मधील ‘उड़ जा काले कावा’ आणि ‘खैरियत’ गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. अशातच, आता या चित्रपटातील ‘मैं निकला गड्डी लेके’ गाणं देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. यापूर्वीच्या ‘गदर’ चित्रपटामध्ये देखील हे गाणं होत ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. ‘गदर’ हे गाणं वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. या गाण्यामध्ये सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा डान्स करताना दिसत आहेत.
या चित्रपटात अभिनेते सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच अभिनेता उत्कर्ष शर्मा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री सिमरत कौर सनी देओलच्या सूनेच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 100 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर अभिनेता सनी देओलने चित्रपटासाठी 5 कोटी चार्ज केले आहेत. अमिषा पटेलने 2 कोटी चार्ज केले आहेत.