सावंतवाडी : नववर्षाच्या सुरुवातीलाच दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित उडान महोत्सवात खाद्य जत्रेसह मनोरंजनाची मेजवानी सावंतवाडीकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. रविवारी १ जानेवारी २०२३ ला रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक यांच्या पुढाकाराने रंगखांब पुरस्कृत लोकरंग या पारंपरिक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक कार्यक्रमासह आधुनिकतेचा साज असणारा हा कार्यक्रम सावंतवाडीकरांसाठी पर्वणी ठरणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष रोट्रॅक्ट मिहीर मठकर आणि धनराज पवार यांच्याकडून करण्यात आल आहे.