बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टच वर्षभरापूर्वीच आई-बाबा झाले. गेल्या वर्षी 6 नोव्हेंबर रोजी आलियाने तिच्या मुलीला जन्म दिला. 6 नोव्हेंबर 2023 तिच्या मुलीचा पहिला वाढदिवस होता. राहाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आलियाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये राहाची सुंदर झलक पाहायला मिळत आहे.
नुकतीच आलियाने तिच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामधील पहिल्या फोटोत राहा केकसोबत खेळताना दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोमध्ये राहाच्या हातामध्ये फुलं दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करत आलियाने कमेंटमध्ये लिहिलंय की, “आमचा आनंद, आमचं आयुष्य, आमचा प्रकाश. असं वाटतंय की कालचं आम्ही तुझ्यासाठी गाणं वाजवत होतो. जेव्हा तू माझ्या पोटोत लाथ मारत होतीस. सांगण्यासारखं काही नाही. फक्त केवळ इतकंच सांगते की तू आमच्या आयुष्यात आल्याने आम्ही खूप धन्य झाले आहे. वाघाच्या बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही तुझ्यावर प्रेमापेक्षा जास्त प्रेम करतो.”