
सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), शाखा-सावंतवाडी यांच्या वतीने डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेचा' निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. सावंतवाडी तालुक्यातील २२ शाळांमधील एकूण २७२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
गटनिहाय विजेते विद्यार्थी
ही परीक्षा प्रामुख्याने दोन गटांत घेण्यात आली होती. दोन्ही गटांतील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. ५ वी ते ७ वी गट: प्रथम क्रमांक: पद्मश्री विजय राऊळ (माडखोल नं. १) द्वितीय क्रमांक: मानस महादेव राऊळ (सांगेली हायस्कूल) तृतीय क्रमांक: अनुष्का उमेश गवळी (आंबेगाव नं.१) ८ वी ते १० वी गट: प्रथम क्रमांक (विभागून): रिधीमा रविकमल सावंत (मिलाग्रीस हायस्कूल) आणि आत्माराम विजय राऊळ (माडखोल हायस्कूल) द्वितीय क्रमांक: पारस देविदास दळवी (कळंबिस्त हायस्कूल) तृतीय क्रमांक: भाविका दिलीप चव्हाण (नवोदय विद्यालय) उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेने परीक्षेत छाप पाडली असून, त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये मयुरी गोसावी, निर्झरा हुले, वैभवी मोरजकर, प्रतीक गावडे, रिया कोटकर, गिरीजा राणे, नेहा पेडणेकर, जय जंगले, पियुशा नेहरकर, जागृती राऊळ, विठ्ठल सावंत, नेहा कोटकर, शमिका केसरकर, हर्षिता राऊळ, वृषाली जाधव, वेदिका शेळके, समीक्षा गुरव, यश गवस, सुमंत म्हापसेकर, सोहम चितारी आणि आराध्य परब यांचा समावेश आहे.
बक्षीस स्वरूप व वितरण समारंभ
प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५०००/-, २०००/- आणि १०००/- रुपये रोख, तसेच ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात येईल. उत्तेजनार्थ विजेत्यांना स्कूल बॅग, कंपास बॉक्स आणि पॅड देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता, 'हरे कृष्ण सत्संग केंद्र', भटवाडी, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धा कृष्णनाम प्रभुजी (बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उत्तरपत्रिका तपासणीचे काम निवृत्त शिक्षिका शैलजा सावंत, शीतल सावंत, हर्षद खडपकर आणि आरोही खडपकर यांनी पाहिले. या स्पर्धेची बक्षिसे निर्मल प्रकाश गोवळकर यांनी स्व. श्री. प्रकाश रामजी गोवळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रायोजित केली आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी दीपक भराडी (देवकीपुत्र प्रभुजी), दिनेश सावंत (दयाल गोविंद प्रभूजी), तुषार सावंत, विजय राऊळ (वसु श्रेष्ठ दास), गोडसे मॅडम, मनीषा वाडकर, राजेश वाडकर, ऐश्वर्या सावंत तसेच डॉ. पावसकर, डॉ. चितारी, सुनील मडगावकर, शैलेश पै, सुनील गावडे, चंदन भराडी, ओशन मोटे आणि शेडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. तालुक्यातील सर्व शाळांतील शिक्षकांचेही या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले.










