
सावंतवाडी : रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल स्पर्धेत आरोंदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत गौरी सदानंद गावडे कोलाज मेकिंग मध्ये द्वितीय - ट्रॉफी व साऊंड बार , शिवाजी रुपेश धर्णे रंगभरण स्पर्धेमध्ये फुटबॉल व ट्रॉफी दुर्वा वासुदेव रेडकर - कोलाज मेकिंग ट्रॉफी, आनंदा मगाण्णा कुद्रेमणी - फिंगर अँड थम प्रिंट ट्रॉफी, प्रितेश दिवाळप्पा वसावे - ब्राँझ पदक, काजल देवेंद्र नाईक - टॅटू मेकिंग ट्रॉफी , विभा विष्णू मातोंडकर - ब्राँझ पदक नंदिनी विनायक पोळजी - उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केली.या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे कलाशिक्षक चंदन गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रशालेच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष संदेश परब, उपाध्यक्ष बबनराव नाईक, खजिनदार रुपेश धर्णे, मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे तसेच संस्था संचालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित करण्यात आले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.कोरगावकर यांनी केले.











