अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची रात्रीपासूनच गर्दी

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 11, 2022 12:45 PM
views 274  views

मुंबई : बॉलिवूडचे बादशाह जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आज 80 वर्षांचे झाले आहेत. आज 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन यांचे देशभरात अनेक चाहते आहेतच त्याचसोबत परदेशातही त्यांचे अनेक चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांचे चित्रपट आणि त्या चित्रपटांमधील त्यांची गाणी आणि संवाद हे आजही अनेकांच्या लक्षात आहेत. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांच्या डान्सचे सुद्धा अनेक चाहते आहेत. दरम्यान अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या ‘जलसा’ या घराबाहेर अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. अमिताभ बच्चनही घराबाहेर येऊन चाहत्यांना भेटले.

अमिताभ बच्चन मध्यरात्रीनंतर त्यांच्या ‘जलसा’ हातातून बाहेर पडले त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने चाहते त्यांना भेटण्यासाठी जमले होते. अमिताभ बच्चनही सर्वांना भेटले. त्यामुळे त्यांचे चाहतेसुद्धा खूप आनंदी दिसत होते. याचाच एक व्हिडिओसुद्धा ट्विटर वर पाहायला मिळत आहे.

मागील अनेक वर्षे अमिताभ बच्चन त्यांच्या विशेष शैलीत कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. दरम्यान या कार्यक्रमाच्या एका भागात अमितावह बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्यासह बिग बी आज केबीसीच्या मंचावर येऊन प्रेक्षकांना एक खास सरप्राईज सुद्धा देणार आहेत. या शोमध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यातील काही खास क्षणांची पुनरावृत्ती होताना दिसणार आहे. अमिताभ बच्चन बर्थडे स्पेशल एपिसोडमध्ये अभिषेक बच्चन आणि जया बच्चन केबीसीच्या मंचावर दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यांना आतापर्यंत स्पर्धकांना प्रश्न विचारताना प्रेक्षकांनी पहिले होते. पण आता कार्यक्रमाच्या येणाऱ्या भागात अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत हॉट सीटवर बसलेले दिसणार आहेत आणि बिग बी यांना त्यांच्या पत्नी जया बच्चन प्रश्न विचारणार आहेत.