ब्युरो न्युज : जो आणि अँथनी रुसो यांनी आजवर काही सर्वात मोठे आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत, ज्यामध्ये जबरदस्त सिनेमॅटोग्राफी, आकर्षक कथाकथन असून, एपिक अॅक्शनसाठी प्रशंसा केली गेली आहे. अशातच, आता या जोडीची 'सिटाडेल'ही उत्कृष्ट ग्लोबल सिरीज दर्शकांच्या भेटीला येणार आहे ज्यामध्ये रिचर्ड मॅडन आणि प्रियांका चोप्रा जोनास हे मुख्य भूमिका साकारत आहेत. या सीरिजच्या ट्रेलरने उत्सुकता वाढवली आहे यात शंका नाही. अलीकडेच, या सीरिजबद्दल बोलताना रुसो ब्रदर्स यांनी सांगितले कि या शोद्वारे ग्लोबल सिरीज बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
या ग्लोबल फ्रँचायझीच्या मेकिंगबद्दल जो रुसो म्हणाले,"आम्ही विचार केली कि एका नरेटिवसाठी हा एक नवा विचार होता तसेच, स्टोरीटेलर्सची ग्लोबल कम्यूनिटी बनवण्याचा हा उत्तम मार्ग ठरेल. एक विशाल मोज़ेक कथा एकत्र करणे. आम्ही इतर चित्रपटांवर काम करण्यात आणि जगभर फिरण्यात वेळ दिल्यानंतर, मला वाटते की अँथनी आणि माझ्यासाठी ही कल्पना खरोखरच रोमांचक होती आणि आम्हाला एक प्रकारचे आव्हान स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले."
यावर पुढे बोलताना अँथनी रुसो म्हणाले,"जो आणि मी यासारखी कल्पना यापूर्वी कधीही ऐकली नव्हती. जेन सल्के (अमेझॉन स्टुडिओचे प्रमुख) यांच्या दूरदर्शी दृष्टीचे खरे श्रेय आहे. की त्या आम्हाला कल्पना देतील, मुळात एका शोचे मॉडेल जे इतके महत्त्वाकांक्षी, व्यापक आणि जागतिक स्वरूपाचे होते. हे असे काहीतरी आहे ज्यावर मी आणि जो अनेक वर्षांपासून काम करत आहोत. स्टोरीटेलर म्हणून, आम्हाला ग्लोबल फिल्म कम्युनिटीचा सहभाग खरोखर आवडतो. ही एक अद्भुत संधी आहे. आम्ही आमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकणारी योग्य कथा शोधण्याचा प्रयत्न करत होतो. तसेच, आम्ही ते शोधू शकणाऱ्या उत्तम सहयोगींसाठी भाग्यवान होतो.
या 6 भागांच्या सिरीजमध्ये प्रियांका चोप्रा जोनास आणि रिचर्ड मॅडन यांच्यासह स्टॅनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिल देखील आहेत. रूसो ब्रदर्सच्या एजीबीओ आणि शोरनर डेव्हिड वीलद्वारा यांनी एक्जीक्यूटिव-निर्मित, 'सिटाडेल'चा प्रीमियर 28 एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओवर होणार आहे आणि 26 मे पर्यंत दर आठवड्याला सिरीजचा एक भाग प्रसारित केला जाईल. हि ग्लोबल सिरीज इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळमसह 240 देश आणि प्रदेशांसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल.