DJ SNAKE आहे जॅकलीन फर्नांडिसचा फॅन !

स्नेक म्हणाला, मी जॅकलिनचा चाहता आहे आणि मला भविष्यात तिच्यासोबत काम करायला आवडेल..
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 03, 2022 16:35 PM
views 273  views

ब्युरो न्यूज : सनशाईन गर्ल जॅकलीन फर्नांडिस तिचा अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखली जात असून, तिचे चाहते सर्वत्र आहेत. आता या फॅन क्लबमध्ये सुप्रदसिद्ध संगीत निर्माता आणि डीजे असलेल्या डीजे स्नेक चे नाव सामील झाले आहे.   


डीजे स्नेक हा एक सुप्रसिद्ध फ्रेंच संगीत निर्माता आणि डीजे आहे ज्याने नेहमीच आपल्या संगीतने दर्शकांना वेड लावले आहे. एका मुलाखतीदरम्यान, त्याला कोणासोबत काम करायला आवडेल असे विचारल्यास तो म्हणाला, "मी जॅकलिन फर्नांडिसचा चाहता आहे आणि मला भविष्यात तिच्यासोबत काम करायला आवडेल." तो पुढे म्हणाला, “रणवीर सिंग हे देखील एक नाव आहे ज्याच्याशी मी जोडण्यास उत्सुक आहे. मी आता काही भारतीय संगीतकारांच्या संपर्कात आहे आणि आम्ही काही रोमांचक प्रेरणा आणि कल्पनांची देवाणघेवाण करत आहोत."


जॅकलीन निश्चितपणे डीजे स्नेकच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अव्वलस्थानी आहे. पुढे तो म्हणाला, "मला जॅकलीन फर्नांडिसला एकदा मुंबईत भेटण्याची संधी मिळाली आणि मी खूप मोठा चाहता आहे. याशिवाय, मी शाहरुख खानचा देखील खूप मोठा चाहता आहे, असेही तो म्हणाला.


वर्कफ्रंटवर, जॅकलीन नुकतीच 'राम सेतू' मध्ये दिसली होती तर तिच्या किटीमध्ये 'सर्कस' आहे आणि अलीकडेच 'क्रॅक' ची घोषणा केली आहे