
ब्युरो न्यूज : १२ सप्टेंबर २०२५ पासून 'दशावतार' हा दमदार आणि वेगळ्या विषयावर आधारित मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे. कोकणातील पारंपारिक दशावतार कला आणि कलाकार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट नक्की कसा असेल याची उत्सुकता रसिकांना लागली आहे. संपूर्ण चेहऱ्यावर चितारलेलं पारंपरिक रंगभूषेचं दृश्य, भीषण आणि प्रभावी नजर हे सर्व काही 'दशावतार' या चित्रपटाच्या गूढतेचा आणि सखोलतेचा प्रत्यय देतं. यात मुख्य भूमिकेत जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे रसिकांच्या समोर येणार आहेत.
चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन सुप्रसिद्ध सुधीर खनोलकर यांनी केलं असून, हे एक पारंपरिक कोकणातील लोकनाट्य आणि समकालीन चित्रपटशैली यांचा सुरेख संगम ठरणार आहे.या कलाकृतीतून केवळ देव-दानवांची कहाणी मांडली जाणार नाही, तर ती एक सामाजिक, आध्यात्मिक आणि भावनिक प्रवासही ठरणार आहे, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले, “दशावतार’ ही कोकणातील मातीशी घट्ट जुळलेली पण जगभरातल्या प्रेक्षकांना सहज आपलीशी वाटेल अशी गोष्ट आहे. त्यातली भव्यता, थरारक प्रसंग आणि भावनिक क्षण हे प्रेक्षकांना आजवर न पाहिलेला अनुभव देतील अशी खात्री आहे .
य चित्रपटाचे निर्माते सुजय हांडे ,ओमकार काटे ,सुबोध खानोलकर ,अशोक हांडे ,आदित्य जोशी ,नितीन साह्स्त्राबुद्दे ,मृणाल साह्स्त्राबुद्दे,संजय दुबे ,विनायक जोशी हे आहेत. तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर याच्यामार्फत हा सिनेमा प्रस्तुत होणार आहे.
सोमवारी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. अंगावर शहरे आणणाऱ्या या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. १२ सप्टेंबर २०२५ पासून प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची रसिक - प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.