कुडाळ : कुडाळ कविलकाटे येथील श्री सिद्धिगणपती मंदिराच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त २३ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या उपस्थितीत कविलकाटे ग्रामसेवक संघ निर्मित आणि साई जळवी फिल्मस् प्रस्तुत 'कोकणचा महाडान्सर' ही भव्य सोलो आणि जोडी डान्स स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेमध्ये १५ वर्षांवरील कलाकारांना सहभाग घेता येणार आहे. प्रथमच कुडाळ शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या नृत्य स्पर्धेसाठी सिनेमालिका क्षेत्रातील सुपरस्टार अभिनेता संतोष जुवेकर, झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको आणि कलर्स मराठी वाहिनीवरील बिस बॉस सिजन ४ फेम सिने अभिनेत्री रुचिरा जाधव आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात सुद्धा आपल्या निवेदनाची छाप पाडणारे सुप्रसिद्ध निवेदक किरण खोत, मुंबई आणि आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रथम २५००० रुपये, द्वितीय ११,१११ रुपये, तृतीय ५,५५५ रुपये, उत्तेजनार्थ २, १११रुपये आणि सहभागी होणाऱ्याप्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या भव्य दिव्य डान्स स्पर्धेसाठी एकूण ११० नृत्यांगनानी आपल्या नृत्याचा ऑडिशन व्हिडिओ पाठवला होता त्या ११० नृत्य कलाकारांमधून एकूण २० बेस्ट नृत्य कलाकार निवडण्यात आले आहेत, त्यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पुणे आणि गोवा राज्यातील स्पर्धकांचा समावेश असणार आहे त्याच बरोबर ह्या स्पर्धेच्या ५ निमंत्रित फेमस डान्स गृप येऊन आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहेत. श्री सिद्धी गणपती मंदिर कविलकाटे, कुडाळ येथे आयोजित केलेल्या कोकणचा महाडान्सर ह्या भव्य दिव्य स्पर्धेला जास्तीत जास्त नृत्य प्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन दिग्दर्शक, प्रोड्युसर तथा कोकण कला केंद्राचे अध्यक्ष साईनाथ जळवी यांनी केले आहे.