मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित दगडी चाळ 2 या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या दगडी चाळनंतर यंदा ‘दगडीचाळ 2’ने यशाचा झेंडा रोवला आहे. तब्बल 7 वर्षे प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात झुंबड उडवली आहे.
प्रत्येक डायलॉगवर शिट्ट्या असो किंवा टाळ्यांचा नाद असो, आख्या महाराष्ट्रात या चित्रपटाने तुफान आणलं आहे. हा चित्रपट 350 हून अधिक स्क्रीन्सवर दाखवला जात आहे. प्रेक्षकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद खरंच थक्क करणारा ठरला आहे.
दहीहंडीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून अवघ्या तीन दिवसात 2 कोटींहून अधिकचा गल्ला (Box Office Collection) जमवला आहे.
दगडी चाळ 2 ची कमाई-
शुक्रवार- जवळपास 51 लाख रुपये
शनिवार- जवळपास 70 लाख रुपये
रविवार- जवळपास 83 लाख रुपये
एकूण- जवळपास 2 कोटी पाच लाख रुपये
‘शंभो’ म्हणत अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या मकरंद देशपांडे यांचा कमाल अभिनय, सूर्याची भूमिका साकारणारा चॉकलेट बॉय अंकुश चौधरी तर कलरफुल पूजा सावंतने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांचा आणि समिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर ‘दगडीचाळ 2’ चा डंका वाजताना दिसत आहे.
निर्मात्या संगीता अहिर म्हणतात,” प्रेक्षक आणि समिक्षकांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम पाहून मन आनंदाने भरून आलं आहे. दगडीचाळ प्रमाणेच ‘दगडी चाळ 2’ला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. कष्टाचं चीज झाल्याचं वाटत आहे. इतक्या कमी वेळात मिळालेल्या उत्तुंग यशानंतर मी निःशब्द झाले आहे.”