मुंबई : बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमार आता मराठी सिनेमात पदार्पण करतो आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित करत असलेला आगामी मराठी सिनेमा 'वेडात मराठे वीर दौड़ले सात' या सिनेमातून अक्षय कुमार मराठी सिनेमात पदार्पण करतोय. अक्षय कुमार या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सिनेमाची घोषणा
मुंबई मध्ये झालेल्या कार्यक्रमात या सिनेमाची घोषणा करण्यात आली . ज्यात अक्षय कुमार छत्रपति शिवाजी महाराजांची भूमिका करतोय हे जाहिर करण्यात आले , यावेळी अक्षय कुमारची ग्रँड एंट्रीही झाली . यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते .