
बाॅलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि धरम पाजी अर्थात धर्मेंद्रचा पुत्र बाॅबी देओल याच्या कारकिर्दीला उतार लागला होता पण अॅनिमल चित्रपटाने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचवले आणि येथूनच त्याच्या कारकिर्दीला झळाली आली. आता हाच बाॅबी देओल पुन्हा एका नव्या आणि दमदार भुमिकेत येत आहे.
सांगायचे झाले तर अॅनिमल चित्रपटात बाॅबी देओल काही मुख्य अभिनेताही नव्हता पण त्याने आपल्या कसदार अभिनयाची चुणूक दाखवत जी भुमिका ठसठशीत निभावली ती अफलातूनच होती. त्याच्या याच भुमिकेने त्याने बाॅलीवूडकरांना आपल्याकडे आकर्षित केले. त्याची भुमिका ही लोकांना अक्षरशः वेड लावणारी ठरली. पडद्यावर खुंखांर अॅनिमल बनला तेव्हा असा नकारात्मक रोल सुद्धा एवढ्या खुल्या मनाने स्वीकारत तो खुबीने सादर करणारा हा अभिनेता आता पुन्हा एका खुंखांर आणि जुलमी बादशहाच्या भुमिकेसाठी सज्ज झाला आहे.
बाॅबी देओल औरंगेबाची भुमिका साकारणार..!- आता पुन्हा बाॅबी दुसऱ्या नकारात्मक भुमिकेसाठी तयार आहे. यापुर्वी औरंगजेबचा रोल छावा चित्रपटात लिलया पद्धतीने आणि एक वेगळ्या थरारक अंदाजात अक्षय खन्नाने साकारला. त्याच्या भुमिकेला लोकांनी एवढे नकारात्मक पाहिले की, यातच अक्षय खन्नाला यश किती मिळाले हे विचार करण्यासारखे आहे.
'अॅनिमल' चित्रपटातील अभिनेता बॉबी देओलच्या अभिनयाची चर्चा दक्षिणेतही पोहोचली होती आणि म्हणूनच दिग्दर्शक ज्योती कृष्णाने पॉवरस्टार पवन कल्याण अभिनीत 'हरि हरा वीरा मल्लू' या त्यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटात मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेसाठी बॉबी देओलची निवड केली. 'अॅनिमल' पाहिल्यानंतर ते बॉबी देओलच्या अभिनयाने इतके प्रभावित झाले होते की त्यांना वाटले की बॉबी देओलच औरंगजेबाच्या भूमिकेसाठी योग्य पर्याय आहे.'
बॉबी देओलचा 'हर हर वीरा मल्लू' हा चित्रपट 24 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा बहुप्रतिक्षित अॅक्शन ड्रामा चित्रपट 24 जुलै रोजी चित्रपटगृहात रसिकांना पाहता येणार आहे 'बॉबी देओलने अॅनिमलमध्ये कोणतेही संवाद न करता सर्व काही दिले, ते माझ्या मनाला भिडले, चित्रपटात तुम्हाला दिसणारा बॉबी पाहिल्यानंतर तुम्ही 'अॅनिमल' चा बॉबी विसरून जाल, तो पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक दिसणार आहे.' असे या चित्रपटाचे दिग्दर्शिक ज्योती कृष्णा यांनी म्हटले आहे.