मुंबई : प्रशांत वर्मा दिग्दर्शित आगामी ‘हनुमान’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाची चाहते मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. काही तासांपूर्वी सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तासाभरात याला लाखो व्ह्यूज मिळाले. या ट्रेलरची सुरुवात हनुमानाची विशाल मूर्ती आणि त्याच्या शक्तींच्या वर्णनाने होते. त्यानंतर त्यात मुख्य अभिनेत्याची एन्ट्री होते. त्याच्या शक्तीने गावातील प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित होतो. या चित्रपटात कलियुगाचा रंगही दाखवला आहे. शिवाय चित्रपटातील प्रत्येक सीन आश्चर्यचकित करणारा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.हनुमान चित्रपट 12 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटात तेजा सज्जा, अमृता अय्यर, सरथ कुमार, विनय, वरलक्ष्मी, वेनेला किशोर, दीपक शेट्टी आणि गेटअप श्रीनू यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 11 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.