ब्युरो :
रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास 3’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाला टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘टाईमपास’च्या सीरिजमधील या तिसऱ्या भागात अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात हृताचा कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे आणि त्याचीच झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबा शप्पथ, आणतोय तीच मजा, तोच टाईमपास एका वेगळ्या अंदाजात. पाहा दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक,’ असं कॅप्शन देत हृताने सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे.