नामाचा ‘आल्‍हाद‘ देतोय भक्‍त ‘प्रल्‍हाद !’

‘महावतार नरसिम्‍हा’ची डरकाळी! : ॲनिमेटेड फिल्‍मची तरुणांमध्‍ये तुफान क्रेझ
Edited by:
Published on: August 07, 2025 20:31 PM
views 56  views

चित्रपट समिक्षण : अविनाश बांदेकर 

आजच्या एआयच्या जमान्यात फेसबुक, इन्‍स्‍टाग्राम, व्‍हॉटसॲपच्या युगात आबालअवृध्‍दांपासून ते तरुणांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणणारा आणि २ तास १० मी. चित्रपटगृहात रोखून धरणारा चित्रपट म्‍हणजे ‘महावतार नरसिम्‍हा’, हा २०२५ चा भारतीय ॲनिमेटेड महाकाव्य पौराणिक ॲक्शन चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केले आहे, ज्याचे लेखन जयपूर्णा दास यांनी केले आहे, क्लीम प्रॉडक्शन्स आणि होंबळे फिल्म्स निर्मित आहे. या चित्रपटात भक्तशिरोमणी प्रल्हाद यांच्या अलौकिक भक्ति आणि संयमाचे दर्शन घडते. आजच्या या युगात नामाचा महिमा भगवंताच्या नामस्मरणात जी शक्ती आहे, ती इतर कुठल्याही तप सिध्‍दीपेक्षा मोठी आहे, याचा प्रसार करण्‍यात आला आहे.

भारतीय चित्रपट सृष्टीत ॲनिमेटेड चित्रपटांपैकी आजवरचा सर्वात चांगला चित्रपट म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहण्यात येत आहे.  या चित्रपटात व्‍हीएफएक्‍स ॲनिमेशन हे उत्तमरित्या साकारलेले आहे. आणी सर्वात महत्वाचं आपल्या हिंदू सनातन धर्माचा प्रसार यातून करण्‍यात आलेला आहे. आजच्या युगातील मुले मार्वल आणि डीसी सारख्‍या प्रसिद्ध कॉमिक बुक कंपन्यांच्या सुपरहिरोंना पसंती देत असताना इकडे आपल्या धर्मात पण असे सुपरहिरो आहेत. यांची आठवण चित्रपटातून करुन देण्‍यात आली आहे. आज जास्‍तीत जास्त लहान मुले, ज्येष्‍ठ तसेच तरुणाईने सुध्‍दा या चित्रपटाला पसंती दिली आहे.

या चित्रपटात भगवान विष्‍णूंचे दशावतारापैकी २ अवतार दाखवण्‍यात आले आहेत. वराह अवतार आणि नरसिंह अवतार जेव्‍हा पडद्यावर यांची एन्ट्री होते तेव्‍हा अक्षरश: चित्रपटगृहात सर्वांचे हात आपणच जोडले जातात आणि प्रत्येकाच्या डोळ्‍यांतून अश्रूंची धारा वाहते. कारण आजपर्यंत आपल्याला लव्‍ह स्टोरी, हॉरर, थ्रीलर असे चित्रपट दाखवण्‍याचा प्रयत्न केला. पण आज होबळे फिल्म्सच्या निर्मात्यांनी आमच्या पौराणिक कथा आपले देवता त्यांच्या असंख्‍य लिला यातून दाखवण्‍याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खरचं कुठेतरी प्रत्येकाच्या भावना चित्रपट पाहताना उफाळून येत आहेत. आणि आपल्या धर्माबद्‍दल आपल्या देवतांबद्‍दल आस्था वाढत चालली आहे. 

काहिंचे अस म्हणणे आहे की हा चित्रपट पाहताना माणूस असा त्यात मग्न होतो आणि जेव्‍हा भगवान विष्‍णूंचा वराह अवतार आणि नरसिंह अवतार दाखवला जातो तेव्‍हा तेथील वातावरण पवित्र होउन जाते, की आपण खरच सतयुगात आलोय की काय अशी प्रचिती येते. काही ठिकाणी तर लोक चित्रपटगृहाच्या बाहेर आपली पादत्राणे काढून प्रवेश करत आहेत. एवढी लोकांची आस्था निर्माण झाली आहे. 

भक्तशिरोमणी भक्त प्रल्हाद यांच्या भक्तीत किती संयम आहे हे आजच्या पिढीने त्यातून खूप काही घेण्‍यासारखे आहे. हल्लीच्या धावपळीच्या युगात आपल्याला २ मिनीटे देवापुढे नमस्कार करायला सुध्‍दा वेळ नाही आहे. पण या चित्रपटातून भक्ती महिमा आणि नामाच्या शक्तीचा प्रसार केला आहे. जेणेकरुन आपण त्यातून काहिच नाही तर भगवान विष्‍णूंच्या नामाच्या आधारावर तरी या भौतिक जगात तरु शकतो. हे आजच्या पिढीने स्विकारलं पाहिजे. आणि काहिच नाही तर आपण जेथे असू तिथे जरी नामस्मरणाचा अवलंब केला तर आपले पुढील जीवन नक्कीच सुखकर होईल, यात दुमत नाही. 

चित्रपटगृहातून बाहेर पडणारा रसिक शेवटी एकच सांगतो कि हा चित्रपट सर्व सनातन वासियांनी आपल्या कुटुंबासोबत पहावा आणि आपल्या कुटुंबातील लहान मुलांना भक्तीचा मार्ग दाखवावा. आणि आपला इतिहास आपल्या पौराणिक कथा यांतून किती काय मोलाचे मार्गदर्शन मिळते तेवढे आत्मसात करावे. आणि बाहेर येणार्‍याच्या मुखात फक्‍त एकच  नाम असते, ते म्हणजे "ओम नमो भगवते वासुदेवाय नम:"