अक्षय कुमारला मिळाल भारतीय नागरिकत्व

Edited by: ब्युरो
Published on: August 16, 2023 12:17 PM
views 820  views

बॉलिवूड मधील अभिनेता अक्षय कुमारने स्वातंत्र्य दिनानिमित्त एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याने आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळाल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियात याआधी अक्षय कुमारला कॅनाडाचा नागरिक असल्याने खुप वेळा ट्रोल केले गेले होते. अशातच आता अक्षयला भारतीय नागरिकत्व मिळाल्याच्या कागदपत्रांचा एक फोटो शेअर केला आहे.


अक्षय कुमार प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. मात्र यावेळी एक पोस्ट शेअर केली पण त्यात एक ट्विस्ट होता. या बद्दल एक ट्विट केले आहे. त्यामधील फोटोतील कागदपत्रावर त्याचे नाव अक्षय हरिओम भाटिया असे लिहिले आहे. अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करत लिहिले की, हृदय आणि नागरिकत्व दोन्ही ही हिंदुस्तानी आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद.


अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ओएमजी-2 मुळे तो चर्चेत आहे. गदर-2 सारख्या सिनेमाकडून टक्कर जरी मिळत असली तरीही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंदीस पडत आहे.या व्यतिरिक्त अक्षय लवकरच साउथ सुपरहिट सिनेमा सोराइई पोटरुच्या हिंदी रिमेक मध्ये झळकणार आहे. या सिनेमात त्याच्या सोबत राधिका मदान भुमिका साकारणार आहे.