मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबात तणाव असल्याच्या बातम्या येत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात सतत मतभेद होत असल्याची चर्चा आहे. आता तर, ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील अंतर खूप वाढले आहे. दोघेही आजपर्यंत एकत्र होते ते फक्त त्यांच्या मुलीमुळे. पण आता परिस्थिती इतकी बिघडली आहे की, दोघांचे वैयक्तिक आयुष्यही समाज माध्यमांमध्ये आले आहे. ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबापासून दूर राहत असल्याची चर्चा समाज माध्यमांवर आहे. मात्र, याबाबत बच्चन कुटुंबीयांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
ऐश्वर्या राय बच्चनचे तिच्या सासू जया बच्चनसोबतचे नातेही काही खास नाही. दोघीही एकमेकांशी बोलत नाहीत. या वादांमध्ये अभिषेकने नेहमीच आपल्या पालकांना साथ दिली आहे. या कारणांमुळे ऐश्वर्या आणि तिच्या अभिषेकमध्ये भांडणे वाढली आहेत. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी ‘जलसा’ घर अभिषेक बच्चनची बहीण श्वेता बच्चन हिच्या नावावर केले आहे. अमिताभ यांनी हा निर्णय घेतल्यापासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील तणावाच्या बातम्याही वेगाने येत आहेत.