आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने १८ मार्च रोजी स्पर्धेचे आयोजन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 16, 2026 20:02 PM
views 16  views

कुडाळ :  कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील श्री सिंधुदुर्ग राजा गणरायाच्या मैदानामध्ये बुधवार १८ मार्च रोजी संध्या. ५ वाजल्यापासून महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा महिलांसाठी असून १० महिलांचा संघ यामध्ये सहभागी होऊ शकतो स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रुपये १० हजार व चषक द्वितीय क्रमांक रूप रुपये ५ हजार व चषक तृतीय क्रमांकास रोख रुपये ३ हजार व चषक तसेच सहभागी संघातील महिलांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे तरी इच्छुक महिला संघानी आपली नाव नोंदणी रेवती राणे (९४२२३७९६१२) व नगरसेविका चांदणी कांबळी (९९२१०५६४१९) यांच्याजवळ करावी असे आवाहन शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी केले आहे.